ध्येय आणि दृष्टीकोन

ध्येय

मुद्रणाची कामे व मुद्रण कार्याचे वर्गीकरण
संचालक, शासकीय मुद्रण व लेखनसामग्री, हे शासनाची खाली नमूद केलेली मुद्रणाची कामे करतात. सदरील कामांचे पुढील प्रकारात वर्गीकरण करण्यात आलेले आहे :-

  1. पुस्तक स्वरुपातील मुद्रण.
  2. नमुन्यांचे मुद्रण- (एक) प्रमाण नमुने, (दोन) विशेष नमुने, (तीन) सर्वसाधारण नमुने, (चार) अनुसूचित नमुने.
  3. गावांचे नकाशे, तालुक्यांचे नकाशे, नगर सर्वेक्षण नकाशे, जिल्ह्यांचे नकाशे, राज्यांचे नकाशे, इत्यादींसारखे नकाशे.
  4. भित्तीपत्रके, मोडपत्रके, इत्यादी.
  5. उमटरेखित लेखनसामग्री.
  6. दैनंदिनी व कॅलेंडरे.
  7. प्रसिद्धीविषयक साहित्य, सांस्कृतिक प्रकाशने यांसारखे दर्जेदार मुद्रणाचे काम.

संचालक, शासकीय मुद्रण व लेखनसामग्री, हे राज्यातील शासकीय कार्यालयांना त्यांच्या नियंत्रणाखालील लेखनसामग्री आगारांमार्फत पुढील बाबी पुरविण्याची व्यवस्था करतील :-

1 लेखनसामग्री वस्तू 5 सायकली
2 आरेखन वस्तू 6 घड्याळे व गजराची घड्याळे
3 पोषाखाचे कापड 7 प्रतिलिपी यंत्रे
4 छत्र्या    

दृष्टीकोन

आधुनिकीकरण
संचालनालया अंतर्गत, छपाई यंत्रे व इतर आनुषंगिक यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण करून कालमर्यादेत आकर्षक छपाई कशी करता येईल, याकडे प्राथम्याने लक्ष देणे.

विविध प्रकाशने व सेवा
संचालनालयाच्या नियंत्रणाखाली विविध प्रकाशनांची छपाई करण्यात येते. त्यापैकी मुख्यत: राजपत्रांचे एकूण 52 भाग प्रकाशित करण्यात येतात. राजपत्राच्या प्रकाशनात प्रामुख्याने नाव, वय व धर्म बदलणे, तद्वतच विभागीय प्रकाशने, पुरवणी प्रकाशने यांची कार्ये अविरतपणे सुरू असतात. वरील सर्व सेवा एकाच वेळी जनतेला उपलब्ध व्हाव्यात याकरिता संचालनालयाने संगणकीय प्रणाली सुरू करून त्यामार्फत आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे ठरविले आहे.

शासकीय प्रकाशने/पुस्तके/ग्रंथ
संगणकीकरणांतर्गत शासकीय ग्रंथागारे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने अद्ययावत करणे, बुकशॉपी आकर्षक करणे तसेच सांस्कृतिक प्रकाशने फिरत्या ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा सदोदित प्रयत्न करणे. त्यामुळे सर्व साहित्य लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होऊन विक्री वाढविण्यासाठी अविरत प्रयत्न करणे.

स्टेशनरी डेपो
शासकीय विभागांना/शासनाला लागणारी लेखनसामग्री व छापील नमुने सुलभरीत्या उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने त्यासाठी स्टेशनरी डेपोमधून वितरित केली जाणारी विविध प्रकारची स्टेशनरी त्याची उपलब्धता तद्वतच कालबाह्य झालेल्या वस्तुंचा अभ्यास करून त्यात गुणवत्ता/दर्जा वाढविण्यासाठी संचालनालयीन स्तरावर वस्तूंचा अभ्यास करुन तसे प्रयत्न करणे तसेच अद्ययावत पर्यायी वस्तुंचा पुरवठा करणे यासाठी आवश्यक प्रयास करणे, हाच संचालनालयाचा नेहमी प्रयत्न आहे व तो राहील.

कला शाखा
शासकीय मुद्रणालयांमधील मुद्रणविषयक कामांचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने कला कार्याधिकारी यांच्या प्रभाराखाली मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयात सन १९५९ पासून एक कला शाखा सुरू केली आहे. या कला शाखेमध्ये सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रकाशने, दिनदर्शिका, मोडपत्रके, भित्तीपत्रके इत्यादींसारख्या निवडक व दर्जेदार प्रकाशनांच्या बाबतीत उपलब्ध कार्यक्षमतेनुसार संकल्पचित्रे व आराखडे तयार करण्यात येतात.