शासकीय ग्रंथागारे

शासकीय ग्रंथागारांकडून शासकीय प्रकाशनांची विक्री तेथील विक्रीच्या खिडक्यांवर (काउंटर) करण्यात येते. त्याचप्रमाणे रक्कम आगाऊ प्रदान करण्यात आली असेल तर ती प्रकाशने टपालाने पाठविण्यात येतात. तसेच ही ग्रंथागारे त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमधील शासकीय कार्यालयांना महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम, 1965 याच्या नियम 140 अनुसार विनामुल्य शासकीय प्रकाशने पुरवतात.

भारत सरकारची काही महत्वाची प्रकाशने मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील शासकीय ग्रंथागारात ठेवण्यात येतात व त्याद्वारे त्यांची विक्री करण्यात येते.

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयाच्या नियंत्रणाखाली पाच शासकीय ग्रंथागारे आहेत. या ग्रंथागाराचे प्रभारी अधिकारी व प्रत्येक ग्रंथागाराच्या ठिकाणी असलेल्या विक्रीविषयक सुविधा खाली दर्शविण्यात आल्या आहेत.

अ.क्र. ग्रंथागाराचा प्रभारी अधिकारी विक्री विषयक सुविधा शेरा
1 सहाय्य्क व्यवस्थापक (प्रकाशने), शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई. 400 004. अ) महाराष्ट्र शासनाची प्रकाशने
ब) महाराष्ट्र राज्य नकाशे व मुंबई शहर सर्वेक्षण पत्रके.
क) महत्वाची केंद्र शासनाची प्रकाशने.
नागरिकांना डाकपार्सल, इ. द्वारे विक्री केली जाते आणि मुंबई, कोकण व नाशिक विभागातील शासकीय कार्यालयांना मोफत पुरवठा केला जातो.
2 व्यवस्थापक, शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे. 411 001. अ) महाराष्ट्र शासनाची प्रकाशने
ब) सर्व निर्बंधित नकाशे वगळून महाराष्ट्र राज्य नकाशे, सर्व जिल्ह्यांचे व तालुक्यांचे नकाशे.
नागरिकांना डाकपार्सल, इ. द्वारे विक्री केली जाते आणि पुणे विभागातील शासकीय कार्यालयांना मोफत पुरवठा केला जातो.
3 सहाय्यक संचालक, शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागार, छत्रपती संभाजीनगर. 431 005. अ) महाराष्ट्र शासनाची प्रकाशने
ब) महाराष्ट्र राज्य नकाशे.
क) महत्वाची केंद्र शासनाची प्रकाशने.
नागरिकांना डाकपार्सल, इ. द्वारे विक्री केली जाते आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील शासकीय कार्यालयांना मोफत पुरवठा केला जातो.
4 व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय व ग्रंथागार, सिव्हील लाईन्स नागपूर. 440 001. अ) महाराष्ट्र शासनाची प्रकाशने
ब) महाराष्ट्र राज्य नकाशे.
क) महत्वाची केंद्र शासनाची प्रकाशने.
नागरिकांना डाकपार्सल, इ. द्वारे विक्री केली जाते आणि नागपुर व अमरावती विभागातील शासकीय कार्यालयांना मोफत पुरवठा केला जातो.
5 व्यवस्थापक, शासकीय मुद्रणालय व लेखनसामग्री भांडार, ताराबाई पार्क, कोल्हापूर. 416 003. महाराष्ट्र राज्याची काही महत्वाची प्रकाशने यांची विक्री केवळ काउंटरवरच करण्यात येते. हे ग्रंथागार परिपूर्ण घटक नाही.