नागरिकांची सनद

संचालक,शासकीय मुद्रण,लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय,मुंबई येथील कार्यालयातील कार्य व कर्तव्य तपशिल

कार्यालयाचे नांव - संचालक,शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय,मुंबई
पत्ता - 21-ए,नेताजी सुभाष मार्ग,चर्नीरोड स्टेशनजवळ,मुंबई-400 004
विभागीय प्रमुख / कार्यालय प्रमुख - संचालक
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्थ - उद्योग
कार्यक्षेत्र : मुंबई - भौगोलिक : महाराष्ट्र                कार्यानुरुप :
विशिष्ट कार्य - वरील प्रमाणे
विभागाचे ध्येय/धोरण - शासनाची मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशने विषयक सर्व कामे विहित कालमर्यादेत करुन पुरवठा करणेबाबत.
धोरण - शासन व त्याच्या नियंत्रणाखाली सर्व विभागांना मुद्रण, लेखनसामग्रीची सेवा उपलब्ध करुन देणे.
एकूण पदे - वर्ग -1     -    3 
वर्ग -2     -    7 
वर्ग -3     - 142 
वर्ग -4     -   58 
एकूण पदे     210
कार्य - पदांप्रमाणे
कामाचे विस्तृत स्वरुप - वरीलप्रमाणे
मालमत्तेचा तपशिल - संचालनालयीन इमारत, चर्नी रोड, मुंबई.
उपलब्ध सेवा - मुद्रण खरेदी व पुरवठा तद्नुषगिक
संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यक्षेत्राचे प्रत्येक स्तरावरचे तपशील - राज्य शासकीय/निमशासकीय कार्यालयांचा स्तर.
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळा - 23632693/23630695/23631148/23634049
वेळ : 9.45 ते 5.30
साप्ताहिक सुट्टी - दुसरा/चौथा शनिवार, रविवार आणि शासनाने मान्यता दिलेल्या सार्वजनिक सुट्टया.
विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा - शासकीय कामकाजाची वेळ

परिशिष्ट - एक (संचालनालयाचे क्र.आ-3/6931/कार्या-7, दि.11/09/1997 चे परिपत्रकानुसार )

अ.क्र. विभाग वर्ग, पदनाम व
वेतनश्रेणी + ग्रेड वेतन
कार्यभार व प्रमाणक
1. वर्ग-1 (राजपत्रित)
संचालक
37400-67000+8700
महाराष्ट्र शासनाचे मुद्रण व बांधणी हया प्रमुख कामाचे आठ मुद्रणालयामार्फत संनियंत्रण करणे हे प्रमुख काम आहे. त्या अनुषंगाने आठ मुद्रणालयातील आस्थापनेबाबतच्या बाबी हाताळणे.
 1. गोपनीय अहवाल जतन करणे.
 2. अधिपत्त्याखालील कार्यालयांची भेट तपासणी.
 3. अचानक साठा तपासणी.
 4. उत्पादकता पडताळणी.
 5. वार्षिक अंदाजपत्रके तयार करणे.
 6. वित्तीय नियंत्रण.
 7. स्थावर मालमत्ता व कच्च्या मालाची खरेदी/विल्हेवाट.
 8. सर्व मुद्रणालय व लेखनसामग्री भांडारे यांचेवर नियंत्रण.
 9. नेमणूका व पदोन्नती.
 10. कामगार विषयक बाबी.
 11. लोकलेखा समिती व अंदाजपत्राक समितीविषयक बाबी.
 12. कोर्ट केसेस व विभागीय चौकश्या.
2. वर्ग-1
उप संचालक    
15600-39100+7600
 1. कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे व त्यानुसार उत्पादकता पडताळणे.
 2. मुद्रणालयाकडे मुद्रण कामाचे वाटप करणे व त्यानुसार उत्पादकता पडताळणे.
 3. मुद्रणालयातील यंत्राची देखभाल, दुरुस्ती व मंजुऱ्या.
 4. अतिकालिक कामास मंजुऱ्या देणे.
 5. शिवराज मुद्रणालयाची प्रकरणे.
 6. शासकीय कार्यालयाकडून मुद्रण व लेखनसामग्री पुरवठयासंबंधीच्या तक्रारीचे निवारण.
 7. मुद्रणालयांची तांत्रिक तपासणी
 8. खाजगी मुद्रणालयांकडून मुद्रण.
 9. मुद्रणालये व तलेखनसामग्री भांडारे यांच्यासाठी लागणाऱ्या सामग्रीची मागणीपत्रे प्राप्त करुन संकलित करणे.
 10. साधनसामग्रीच्या स्पेसिफिकेशन कॅटलॉग अद्यावत करणे.
 11. मागणीपत्रे प्राप्त होणे, निविदा प्रसारीत करणे याबाबत वार्षिक कॅलेंडर तयार करणे.
 12. मुद्रणालये व लेखनसामग्री भांडारे यांच्यासाठी साहित्य खरेदी.
 13. मुद्रणालयाकडील व लेखनसामग्री भांडारामधील साठयाचे दर तिमाहीला स्थिती पडताळणे व साठा उपलब्ध करुन देणे.
 14. रद्दी कागद व मालवाहतुकीबाबत कंत्राटीकरण.
 15. जुन्या निकामी साहित्याची विल्हेवाट लावणे.
 16. मुद्रणालयांच्या स्थानिक खरेदी प्रस्तावांची छाननी करणे.
 17.  कामगार संघटनेची निवेदने व तक्रारी यांचे निराकरण.

 
3. वर्ग-1
परिव्यय लेखा अधिकारी
15600-39100+5400
 1. मुद्रण कामांची परिव्यय विविरणपत्रे करुन घेणे व पडताळणी.
 2. आकारणी तत्वावरील लेखनसामग्रीची किंमत निर्धारीत करणे.
 3. राजपत्रांच्या किंमतीची/वार्षिक वर्गणीची किंमत निर्धारीत करणे.
 4. सुधारीत, मुद्रण मुल्य, शिघ्रगणक तयार करणे.
 5. अस्थायी पदांना मुदतवाढ देणे.
 6. सर्व प्रकारची विशेष वेतने/रजा मंजूरी.
 7. पर्यवेक्षकीय पदांच्या तसेच वरिष्ठ पदांच्या पदोन्नत्या व बदल्या.
 8. न्यायालयीन प्रकरणे व विभागीय चोकश्या शिस्तभंगविषयक कार्यवाही.
 9. विवरणपत्रे प्राप्त करुन घेणे व शासनास पाठविणे.
 10. विविध अग्रीमे मंजूर करणे.
 11. वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीस मंजूरी व इतर सवलती.
 12. कामगार संघटनेची निवेदने व तक्रारी यांचे निराकरण.
 13. अंतर्गत लेखा परिक्षणबाहय लेखा परिक्षणांची अनुपालन अहवाल.
 14. वार्षिक भांडार पडताळणीसाठी आवश्यक कार्यवाही.
 
4. वर्ग-1
अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी
9300-34800+4600
 1. मुद्रणालयातील कामगार व लिपिकवर्गीय कर्मचारी व पर्यवेक्षीय परीक्षेवर नियंत्रण.
 2. मुद्रणालयातील कामगाराचे प्रशिक्षण.
 3. भरती नियम तयार करणे.
 4. शिकाऊ उमेदवार भरतीबाबत कार्यवाही करणे.
 5. यशदा व तत्सम बाहय संस्थाचे प्रशिक्षण विषयक बाबीवर पत्रव्यवहार करणे.
5. वर्ग-2
लेखा अधिकारी
9300-34800+4400
 1. टंकलेखन शाखेतील कामावर नियंत्रण ठेवणे.
 2. आवक जावक कामावर नियंत्रण.
 3. जतन कालावधीनुरुप दफ्तरांची मांडणी व विल्हेवाट.
 4. संचालनालयाच्या आस्थापना बाबी, कर्मचारी भरती, वेतनवाढी, रजा मंजु-या, निवृत्ती वेतन प्रकरणे, सेवापुस्तके, बदल्या पदोन्नत्या.
 5. वेतन देयके तयार करणे.
 6. प्रवासभत्ता, घरबांधणी, सण अग्रीम, भविष्य निर्वाह निधी, बिले व इतर बिले.
 7. संचालनालयातील कार्यालयीन खर्च भागविणे व सर्व प्रकारच्या खर्चावर नियंत्रण.
 8. कंत्राटदारांची देयके अदा करणे.
 9. मुद्रणालयाकडील व संचालनालयीन स्तरावरील खरेदी प्रस्ताव छाननी.
 10. संपूर्ण विभागासाठीची वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे.
 11. मासिक खर्चाची विवरणपत्रे प्राप्त करुन एकत्रित खर्च शासनास कळविणे.
 12. ताळमेळ पत्रके छाननी करणे, नोंदवहया ठेवणे, मुद्रणालय व संचालनालयीन स्तरावरील खर्च रक्कमांचा ताळमेळ अधिदान कार्यालय व महालेखापाल कार्यालयाकडील नोंद वहयाशी घेणे.
 13. लोकलेखा समितीस अहवाल सादर करणे.
6. वर्ग-2
कला कार्याधिकारी
9300-34800+4400
 1. सर्व प्रकाशने व पुस्तके यांची कलात्मक रचना करणे व पर्यवेक्षीय करणे.
 2. कव्हर डिझाइन, पोस्टर्स,  चार्टस्, नकाशे, यांचेबाबत स्टुडिओतील कामे.
 3. मुद्रण पूर्व तयारी.
 4. ड्राईंगचे अंतिमीकरण.
 5. टाईप साईजचे प्रमाण, रंगभरणी करणे.
 6. चित्रांचे विषयानुसार रंगसंगती.
 7. अंतिम चित्रानंतर त्याची सर्व प्रकारे तपासणी करणे.
 8. आवश्यक त्या डिजाईनसाठी योग्यप्रकारचे कॅलिग्राफी तयार करणे.
 9. कृष्णधवल फोटोग्राफ टचिंग करणे व मार्कींग करणे.
 10. कला विभागात आलेला ड्रॉईंग साहित्याचे परिक्षण करुन त्याचा अहवाल देणे.
7. वर्ग-2
यंत्र अभियंता (टंकलेखनयंत्रेे)
9300-34800+4400
 1. चक्रमुद्रण यंत्रे व टंकलेखन यंत्रो, सायकली, यांची दुरुस्ती व देखभाल व गणना.
 2. निर्लेखन.
 3. सर्व टंकलेखन कर्मशाळा यांच्यावर नियंत्रण.
8. वर्ग-2
यंत्र अभियंता
(मुद्रणालये)
9300-34800+4400
 1. यंत्रांची प्रतिष्ठापना (सर्व मुद्रणालयातील)
 2. यंत्रांची दुरुस्ती (सर्व मुद्रणालयातील)
 3. सुटया भागांची आयात
 4. यंत्र दुरुस्ती खर्चाच्या देयकाची पडताळणी
9. वर्ग-2
सहायक संचालक
9300-34800+4400
 1. मागणी अधिकाऱ्यांकडून प्राप्त मागणीपत्रांची छाननी करणे व लेखनसामग्री वाटप
 2. प्राप्त लेखनसामग्रीचा साठा ठेवणे व साठा लेखा ठेवणे व बिजके तयार करणे
 3. लेखनसामग्रीच्या पुरवठयातील शासकीय कार्यालयांच्या तक्रारीचे निराकरण करणे
 4. वार्षिक साठा लेखा तयार करणे
 5. लेखनसामग्री वाटपाचे प्रमाण निर्धारीत करणे
 6. विविध नोंदवहया पाहून सेवासूची  व पत्रव्यवहार अद्यावत ठेवणे
 7. दुरुस्ती विषयक खर्चाचे अंदाज तयार करणे व पडताळणी
 8. सुटे भाग खरेदी करणे
10. वर्ग-2
सहा.व्यवस्थापक
(प्रकाशने)
9300-34800+4400
 1. सर्व शासकीय ग्रंथागारांवर नियंत्रण
 2. प्रकाशनांचे पुर्नमुद्रण विषयक कार्यवाही
 3. राजपत्रांच्या वर्गण्या स्विकारणे
 4. जाहिरातीचे प्रकाशन
 5. शासकीय कार्यालयांना प्रकाशनांचा विनामुल्य पुरवठा
 6. प्रकाशनांची विक्री व विक्री प्रोत्साहन
 7. दैनंदिन लेखे ठेवणे
 8. शासकीय मुद्रणालयांना विविध नमुने छपाईस पाठविणे

परिशिष्ट - दोन

संचालक,मुद्रण,लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय,मुंबई येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकाराचा तपशिल

अ.क्र.

पदनाम

अधिकार - आर्थिक

कोणत्या कायद्या/ नियम/ शासन निर्णय परिपत्रकानुसार

अभिप्राय

1

संचालक

 1. सर्व मुद्रणालयातील मुद्रण व लेखनसामग्री कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना ना परतावा भविष्य निर्वाह निधी मंजूर करणे व  घरबांधणी /मोटार वाहन /स्कूटर अग्रिम यांचे शासनाकडून अनुदान उपलब्ध झाल्यानंतर मंजूरी आदेश निर्गमित करणे. अधिकारी/कर्मचारी यांची वैद्यकीय देयके मंजूर करणे.
 2. सर्व मुद्रणालये व लेखनसामग्री भांडारे आणि संचालनालय यांचेसाठी वार्षिक खरेदी प्रक्रिया करणे व त्या अनुषंगाने  अर्थसंकल्पीय अंदाज पत्रक तयार करुन, शासनाच्या मंजूरी नंतर संबंधीत कार्यालयांना  अनुदान उपलब्ध करुन देणे / खर्चावर नियंत्रण ठेवणे व खर्चाचा महालेखापाल खर्चाशी ताळमेळ घालणे आणि त्या अनुषंगाने कमी अधिक खर्च असल्यास शासनास कळविणे.  सर्व मुद्रणालयाचे काम व्यवस्थित नियमानुसार चालते किंवा नाही. हे काम संचालनालयांतर्गत असलेल्या अंतर्गत लेखा परीक्षण शाखेमार्फत तपासणी घेणे.

(1) शासन निर्णय,वित्त विभाग क्र.विअप्र-10.08/ प्र.क्र.70/2008/विनियम, दिनांक 15.5.2009
(2) शासन निर्णय, उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग क्र.भाखस-1080/ (2512)/उद्योग-6,दिनांक 2.1.1992

 


अ.क्र.

पदनाम

अधिकार - प्रशासकिय

कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय परिपत्रकानुसार

अभिप्राय

 

संचालक

महाराष्ट्र शासनाचे मुद्रण व बांधणी हया प्रमुख कामाचे आठ मुद्रणालयामार्फत संनियंत्रण करणे हे प्रमुख काम आहे. त्या अनुषंगाने आठ मुद्रणालयातील आस्थापनेबाबतच्या बाबी हाताळणे.
आठ मुद्रणालयाच्या व्यवस्थापकांचे सेवापुस्तके जतन करणे, त्यांची रजा मंजूर करणे, गोपनीय अहवाल जतन करणे, व  पदोन्नतीचे प्रस्ताव हाताळणे.
सर्व शासकीय कार्यालयांना आवश्यक असणारी लेखनसामग्री व कागद खरेदी करणे व त्याचे सर्व शासकीय कार्यालयांना वाटप करणे.  शासनाच्या कायदा व नियमांची पुस्तके यांची विक्री करणे व पत्रव्यवहार करणे.
सर्व शासकीय भांडारे (मुंबई वगळून) यांच्या खरेदी व पुरवठा यांवर नियंत्रण ठेवणे.
लोकलेखा समिती व कोर्ट केसेस याबाबतची प्रकरणे हाताळणे. शासनाच्या सर्व कार्यालयातील टंकलेखन यंत्राची दुरुस्ती करणे व संधारणा यावर नियंत्रण ठेवणे.

 

(1) शासन निर्णय,वित्त विभाग क्र.विअप्र-10.08/ प्र.क्र.70/ 2008/विनियम, दिनांक 15.5.2009

 


अ.क्र.

पदनाम

अधिकार - फौजदारी

कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय परिपत्रकानुसार

अभिप्राय

-

-

लागू नाही

-

-


अ.क्र.

पदनाम

अधिकार - अर्धन्यायिक

कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय परिपत्रकानुसार

अभिप्राय

1

संचालक

संचालनालय व संचालनालयाच्या अधिनस्थ असलेल्या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची शिस्तभंग विषयक प्रकरणे हाताळणे

1.म.ना.से.(वर्तणूक)   
नियम,1979
2.म.ना.से.(शिस्त व अपील)
नियम,1979

 


अ.क्र.

पदनाम

कर्तव्ये

कोणत्या कायद्या/नियम/शासन निर्णय परिपत्रकानुसार

अभिप्राय

1

संचालक

आर्थिक/प्रशासकीय