शासकीय प्रकाशनांचे अधिकृत विक्रेता म्हणून नेमणूक होणेकरिता शासकीय मुद्रण व लेखनसामग्री नियमपुस्तिकेनुसार खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे :-
- पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेला करारनाम्याचा नमुना रुपये १००/- स्टॅम्प पेपरवर नोटरी करून या कार्यालयास पाठवावा.
- महाराष्ट्र दुकाने व संस्था नियम, १९६१ अन्वये नोंदणी दाखला सत्यप्रत.
- अनामत रक्कम रुपये १००/- (रोख रक्कम, धनाकर्ष किंवा चलनाद्वारे) संचालक, शासन मुद्रण व लेखनसामग्री संचालनालय, मुंबई यांच्या नावे भरणा करावी.
- आपल्या विभागातील दोन सरकारी कार्यालयांची दुकान विक्री चालू असल्यासंबंधी प्रमाणपत्र.
- दुकान मालकाचे पॅन कार्ड.
अधिकृत विक्रेता करारनामा