ध्येय
मुद्रणाची कामे व मुद्रण कार्याचे वर्गीकरण
संचालक, शासकीय मुद्रण व लेखनसामग्री, हे शासनाची खाली नमूद केलेली मुद्रणाची कामे करतात. सदरील कामांचे पुढील प्रकारात वर्गीकरण करण्यात आलेले आहे :-
- पुस्तक स्वरुपातील मुद्रण.
- नमुन्यांचे मुद्रण- (एक) प्रमाण नमुने, (दोन) विशेष नमुने, (तीन) सर्वसाधारण नमुने, (चार) अनुसूचित नमुने.
- गावांचे नकाशे, तालुक्यांचे नकाशे, नगर सर्वेक्षण नकाशे, जिल्ह्यांचे नकाशे, राज्यांचे नकाशे, इत्यादींसारखे नकाशे.
- भित्तीपत्रके, मोडपत्रके, इत्यादी.
- उमटरेखित लेखनसामग्री.
- दैनंदिनी व कॅलेंडरे.
- प्रसिद्धीविषयक साहित्य, सांस्कृतिक प्रकाशने यांसारखे दर्जेदार मुद्रणाचे काम.
संचालक, शासकीय मुद्रण व लेखनसामग्री, हे राज्यातील शासकीय कार्यालयांना त्यांच्या नियंत्रणाखालील लेखनसामग्री आगारांमार्फत पुढील बाबी पुरविण्याची व्यवस्था करतील :-
1 |
लेखनसामग्री वस्तू |
5 |
सायकली |
2 |
आरेखन वस्तू |
6 |
घड्याळे व गजराची घड्याळे |
3 |
पोषाखाचे कापड |
7 |
प्रतिलिपी यंत्रे |
4 |
छत्र्या |
|
|
दृष्टीकोन
आधुनिकीकरण
संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय मुद्रणालयात छपाई यंत्रे व इतर आनुषंगिक यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण करून कालमर्यादेत आकर्षक मुद्रण कसे करता येईल, याकडे प्राथम्याने लक्ष देणे.
विविध प्रकाशने व सेवा
संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय मुद्रणालयांत विविध प्रकाशनांचे मुद्रण करण्यात येते. महाराष्ट्र शासन राजपत्रांचे एकूण ५२ भाग प्रकाशित करण्यात येतात. महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये मध्य उपविभाग, विभागीय पुरवण्या व भाग दोन मध्ये नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिराती यांचे कार्य अविरत सुरु असते. सदरची राजपत्रे नागरिकांना संचालनालयाच्या संकेतस्थळावर ई-राजपत्र स्वरुपात उपलब्ध करून दिले आहेत. तसेच नाव, वय व धर्म बदल व भाग दोन - संकीर्ण सूचना व जाहिराती या चार सेवा नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित करून आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या आहेत.
शासकीय प्रकाशनांची विक्री
संचालनालयाच्या अधिनस्त असलेली शासकीय ग्रंथागारे आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीने संगणकीकरणांतर्गत अद्ययावत करणे, बुकशॉपी आकर्षक करणे. शासकीय प्रकाशने नागरिकांना सहजरीत्या उपलब्ध व्हावीत याकरिता ग्रंथप्रदर्शनामध्ये भाग घेऊन प्रकाशने विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येतात. लवकरच शासकीय प्रकाशनांची ऑनलाईन विक्री संदर्भातील ई-बुक शॉपी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शासकीय लेखनसामग्री भांडारे
शासकीय कार्यालयांना आवश्यक असणारी लेखनसामग्रीच्या वस्तू शासकीय लेखनसामग्री भांडारातून वितरीत केल्या जातात. अद्ययावत लेखनसामग्री वस्तूंची उपलब्धता विचारात घेऊन नवीन अद्ययावत वस्तूंचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.
कला शाखा
शासकीय मुद्रणालयांमधील मुद्रणविषयक कामांचा दर्जा सुधारण्याच्या उद्देशाने कला कार्याधिकारी यांच्या प्रभाराखाली मुद्रण व लेखनसामग्री संचालनालयात सन १९५९ पासून एक कला शाखा सुरू केली आहे. या कला शाखेमध्ये सांस्कृतिक व ऐतिहासिक प्रकाशने, दिनदर्शिका, मोडपत्रके, भित्तीपत्रके इत्यादींसारख्या निवडक व दर्जेदार प्रकाशनांच्या बाबतीत उपलब्ध कार्यक्षमतेनुसार संकल्पचित्रे व आराखडे तयार करण्यात येतात.