1. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातींचा विभाग अंतर्गत जाहिरात प्रसिद्धीसाठी अर्ज कसा करावा ?
- https://dgps.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
- आपले सरकार पोर्टलवर (https://aaplesarkar.mahaonline.gov.in) नोंदणी करण्यात यावी. (नोंदणी करताना स्वत:ची पूर्ण माहिती तसेच फोटो,ओळखीचा पुरावा, निवासी पत्त्याचा पुरावा अपलोड करुन आणि आपल्या मोबाईल क्रमांकावर OTP द्वारेपडताळणी करुन कायमस्वरुपी स्वत:चे युजर प्रोफाईल बनवा)
- प्रशासकीय विभाग उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग निवडा.
- महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदल या पैकी सेवा निवडावी.
- जाहिरातदारांना दिलेल्या सूचना पूर्ण पणे अवलोकनी घ्याव्यात व त्यास अर्जदारानी समंती देणे आवश्यक आहे.
- अर्जाचा नमुनाची प्रिंट काढून अर्ज सविस्तररित्या भरून अपलोड पीडीएफ/जेपीजी स्वरुपात करण्यात यावा.
- वरील नमुना अर्जात भरण्यात आलेली माहिती आहे तशी संगणक पटलावर भरण्यात यावी.
2. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव,वय व धर्म बदलण्याबाबत संकेतस्थळावर भरलेली माहिती बदलता येते का ?
- नाही.
- अर्जाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर अर्जदाराने सादर करण्यात आलेल्या माहितीमध्ये विभागामार्फत कोणताही बदल करण्याची सुविधा उपलब्ध नाही.
3. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातींचा विभाग अंतर्गत किती दिवसात जाहिरात प्रसिद्ध होईल?
- अर्ज प्राप्त झाल्यानंतर सर्वसाधारण १५ दिवसात.
4. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदल जाहिरातींचा विभाग अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता किती शुल्क लागेल?
- शासन शुल्क सर्वसाधारण वर्ग - रु. ५59.00/- (सर्व कर समाविष्ट)
- शासन शुल्क आरक्षित वर्ग (ई.मा.व. वगळून) - रु. 309.00/- (सर्वकर समाविष्ट)
5. अल्पवयीन व्यक्तीकरिता अर्ज करण्याची कार्यपध्दती ?
- 5. अल्पवयीन व्यक्तीकरिता अर्ज करण्याची कार्यपध्दती ?
6. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव,वय व धर्म बदल जाहिरातींचा विभागामध्ये शासन राजपत्र तात्काळ प्रसिद्धी करता येईल का ?
- महाराष्ट्र शासन राजपत्राच्या भागाची दर सप्ताहास प्रसिध्द होत असल्याने तात्काळ प्रसिद्धी होत नाही.
7. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव बदलाबाबतची जाहिरात प्रसिद्धीकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
अ) ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
(वरील कागद पत्रे Jpeg doc- 100 kb पर्यंत व PDF 500 kb पर्यंत आकारामध्ये असावीत)
ब) निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- वीज बिल
(वरील कागद पत्रे Jpeg doc- 100 kb पर्यंत व PDF 500 kb पर्यंत आकारामध्ये असावीत)
क) वयाचा पुरावा (अल्पवयीन व्यक्तींकरिता)
(वरील कागद पत्रे Jpeg doc- 100 kb पर्यंत व PDF 500 kb पर्यंत आकारामध्ये असावीत)
ड) कायदेशीर दस्तऐवज
- शपथपत्र (मधल्या नावात बदलाकरिता)
- विवाह नोंदणी प्रमाणपत्र (विवाहनंतरच्या नावात बदलाकरिता)
- न्यायालयीन दस्तऐवज व शपथपत्र (फक्त घटस्फोटीत महिला अर्जदाराकरिता व दत्तक अर्जदाराकरीता दत्तकपत्र )
(वरील कागद पत्रे Jpeg doc- 100 kb पर्यंत व PDF 500 kb पर्यंत आकारामध्ये असावीत)
इ) पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (JPEG आणि आकार 5 KB ते 20 KB मध्ये व रुंदी 160X उंची 210 PIXELS असावी)
8. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-जन्मतारीख बदलाबाबतची जाहिरात प्रसिद्धीकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
अ) ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
(वरील कागद पत्रे Jpeg doc- 100 kb पर्यंत व PDF 500 kb पर्यंत आकारामध्ये असावीत)
ब) निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- वीज बिल
(वरील कागद पत्रे Jpeg doc- 100 kb पर्यंत व PDF 500 kb पर्यंत आकारामध्ये असावीत)
क) वयाचा पुरावा (अल्पवयीन व्यक्तींकरिता)
- जन्माचा दाखला
- शाळेचा दाखला
(वरील कागद पत्रे Jpeg doc- 100 kb पर्यंत व PDF 500 kb पर्यंत आकारामध्ये असावीत)
ड) पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (JPEG आणि आकार 5 KB ते 20 KB मध्ये व रुंदी 160X उंची 210 PIXELS असावी)
9. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-धर्म बदलाबाबतची जाहिरात प्रसिद्धीकरिता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ?
अ) ओळखीचा पुरावा (कोणताही एक)
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
(वरील कागद पत्रे Jpeg doc- 100 kb पर्यंत व PDF 500 kb पर्यंत आकारामध्ये असावीत)
ब) निवासी पत्त्याचा पुरावा (कोणताही एक)
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- वीज बिल
(वरील कागद पत्रे Jpeg doc- 100 kb पर्यंत व PDF 500 kb पर्यंत आकारामध्ये असावीत)
क) कायदेशीर दस्तऐवज
- धर्मातर नोंदणी प्रमाणपत्र
- शपथपत्र
(वरील कागद पत्रे Jpeg doc- 100 kb पर्यंत व PDF 500 kb पर्यंत आकारामध्ये असावीत)
ड) पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (JPEG आणि आकार 5 KB ते 20 KB मध्ये व रुंदी 160X उंची 210 PIXELS असावी)
10. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदल जाहिरातींचा विभागामधील अर्ज मान्य किंवा अमान्य झाला आहे हे कसे कळेल ?
- अर्जदारास अर्ज मान्य अथवा अमान्य झाल्यास नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश प्राप्त होईल.
11. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदल जाहिरातींचा विभागामधील अर्ज अमान्य झाल्यास रक्कमेचा परतावा किती दिवसात मिळेल ?
अर्जदाराचा अर्ज अमान्य झाल्यास रक्कमेचा परतावा किमान 10 ते 12 दिवसात प्राप्त होईल. तसेच परतावा न मिळाल्यास मे. महाआयटी लि., मुंबई यांच्या dgps.support@mahait.org यावर ई-मेल पाठविण्यात यावा.
12. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदल जाहिरातींचा विभागामधील शासन राजपत्र कोठे शोधता येईल ?
- https://dgps.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या राजपत्र स्थितीमध्ये आपली सेवा निवडा
- आपला अर्ज क्रमांक नमुद करावा.
- पीडीएफ फाईलमध्ये मुख पृष्ठ व आपल्या जाहिरातीच्या पृष्ठाची पाठपोट प्रिट काढावी.
किंवा
- https://dgps.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 1) ई-राजपत्र राजपत्र पहा किंवा राजपत्र स्थिती नाव, वय, धर्म पहा.
- राजपत्र पहा विभागणी निवडा विभाग निवडा भाग दोन (नाव, वय, धर्म बदल) तारीख
13. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदल जाहिरातींचा विभागामधील राजपत्र प्रमाणित प्रतीची आवश्यकता आहे का ?
- सदर महाराष्ट्र शासन राजपत्र इलेक्ट्रॉनीक स्वरूपात असून केवळ ही जाहिरात असल्याने स्वाक्षरीची आवश्यकता नाही.
14. महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन-नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग या राजपत्राच्या भागामध्ये प्रसिध्द करण्यात आलेल्या नाव, वय व धर्म बदलण्याच्या जाहिराती कायदेशीर वैद्य आहेत का ?
- शासकीय मुद्रण व लेखनसामग्री नियमपुस्तिका, 1982 मधील 6.25 नुसार महाराष्ट्र शासन राजपत्रात नाव, धर्म, किंवा जन्मतारीख यांमध्ये बदल करण्याच्या संबंधात अधिसूचना प्रकाशित झाल्यावर त्याच्या आधारावर संबधित व्यक्तीला शासकीय किंवा इतर अभिलेखांमध्ये नाव,धर्म किंवा जन्मतारीख यात बदल करवण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे नाव, धर्म किंवा जन्मतारीख यात बदल करण्याच्या संबंधात कोणत्याही अनधिकृत व्यक्तीने नोटीस दिल्यास अशा नोटीशीचे प्रकाशन म्हणजे अशा रीतीने नाव, धर्म किंवा जन्मतारीख बदलण्यात आल्याच्या संबंधातील अधिप्रमाणित अभिलेख नसून ती एक जाहिरात असल्यामुळे शासन त्याबाबत कोणतीही जबाबदारी घेणार नाही.
15. नवीन कार्यालयाकरिता नोंदणी क्रमांक कसा मिळतो व त्याची कार्यपद्धती काय आहे?
- शासकीय मुद्रण व लेखनसामग्री नियमपुस्तिका, 1982 मधील जोडपत्र क्र. 3 पहावे.
16. महाराष्ट्र शासन राजपत्राचे विविध भाग ई- ग्रॅझेट स्वरुपात कसे पाहता येतील?
- https://dgps.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 1) ई-राजपत्र राजपत्र पहा किंवा राजपत्र स्थिती राजपत्र पहा विभागणी निवडा विभाग निवडा (भाग-1, भाग 1 एल) तारीख